💥पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रकाश चापके यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल बिनविरोध...!


💥शेतकरी विकास पॅनल बिनविरोध निवडून आल्याबद्दल पॅनल मधील सर्व उमेदवारांचे अभिनंदन होत आहे💥

पूर्णा (दि.०७ डिसेंबर) - तालुक्यातील कातनेश्वर येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचे कट्टर समर्थक असलेले राष्ट्रवादीचे पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाश प्रल्हादराव चापके यांचा शेतकरी विकास पॅनल बिनविरोध निवडून आला आहे.

यामध्ये निवडून आलेले सदस्य प्रकाश प्रल्हादराव चापके, नारायण आबासाहेब चापके, पंडितराव रामभाऊ चापके, साहेबराव भीमराव चापके, मेघशाम तुकाराम चापके, सिताराम तात्याराव चापके, सोपान आनंदराव चापके, पठान लाल खॉन. रोशन खान, भागीरथीबाई साहेबराव चापके, जयश्री सचिन चापके, सरपे भीमराव नागोराव, चांदणे रामराव दत्तराव, काळे सखाराम शंकरराव या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली असून कात्नेश्वर ही सोसायटी गेल्या ३५ वर्षापासून स्व. प्रल्हादराव हारजी चापके, पूर्णा कारखान्याचे संचालक यांच्या ताब्यात होती. या सोसायटीचे डिपॉझिट दीड कोटी असून प्रशासकी इमारत एक एकर जागा व दरवर्षी  सभासदांना बोनस वाटप असते. नूतन संचालकांचा माणिकराव चापके, श्रीरंग चापके, सुभाष चापके, पांडुरंग चापके, शेषराव चापके, ज्ञानोबा चापके, रावसाहेब चंद्रकांत चापके, राम चापके, खंडोजी चापके यांनी अभिनंदन केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या