💥विरोधी पक्षनेता अंबादास दानवे वाढदिवसानिमित्त संभाजी नगर येथील संपर्क कार्यालयावर शुभेच्छा स्वीकारणार....!


💥शिवसेना पदाधिकारी,शुभचिंतक,हितचिंतकांनी पुष्पगुच्छ,हार आणु नये असे आवाहन विरोधीपक्ष नेते दानवे यांनी केले आहे💥✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते नामदार अंबादासदादा दानवे यांचा वाढदिवस आज गुरुवार दि.०८ डिसेंबर २०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 


नामदार अंबादासदादा दानवे ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:००  ते १०:०० या वेळेत मातृभूमी प्रतिष्ठान, संपर्क कार्यालय, क्रांतीचौक, संभाजीनगर या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारणार असून शिवसेना पदाधिकारी,शुभचिंतक ,शुभेच्छुक , हितचिंतक यांनी पुष्पगुच्छ, हार आणु नये असे आवाहन ना अंबादासदादा दानवे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या ऐवजी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या उदात्त हेतूने गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वही व रजिस्टर स्वीकारले जातील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन विरोधी पक्षनेते अंबादासदादा दानवे यांनी केले आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या