💥लव जिहाद व धर्मांतरण विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी हिंदू समाज बांधवांचा जिंतूरात भव्य मुकमोर्चा.....!


💥असंख्य हिंदू समाज बांधव मुक मोर्चात झाले सहभागी💥


 
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.04 डिसेंबर) : राज्यासह देशात लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी जिंतूर शहरात आज रविवारी भव्य मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सध्या दिल्ली येथील आफताब पुनावाला याने तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धा हिचा अमानुष खून करून तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली  हे प्रकरण तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आले आहे.


           यातील आरोपी आफताब पुनावाला यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशात सर्वत्र लागू करण्यात यावा यासाठी आज रविवारी  सकाळी १० वाजता शहरातील येलदरी रस्त्यावरील संत श्री भगवानबाबा चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील  हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहरातील जिल्हा परिषद मैदानावर एकत्र जमून हिंदू समाज बांधवांच्या वतीने तहसील प्रशासना मार्फत  राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना  विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या