💥परळीचे डॉ.रवींद्र जगतकर यांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत ३४ हजार रुग्णांना मिळवुन दिला शस्त्रक्रियेचा लाभ....!


💥शस्त्रक्रियेसाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च करून रुग्णांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच आरोग्य सुविधा पुरविण्याचा प्रयत्न💥

परळी वैजनाथ / ठाणे (प्रतिनिधी) - शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून नागरीकांना अनेक आजारांवर मोफत इलाज करण्याची सुविधा आहे.परंतु माहितीअभावी अनेक नागरीक याचा लाभ घेत नाहीत परळीचे भुमिपुत्र डॉ.रवींद्र जगतकर यांनी ठाणे जिल्ह्याचे महात्मा फुले जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक म्हणुन 34 हजारापेक्षा अधिक रुग्णांना या योजनेतून शस्त्रक्रियेचा लाभ मिळवुन दिला आहे. 


 शस्त्रक्रियेसाठी लागणारा लाखो रुपयांचा खर्च करून रुग्णांना खासगी रुग्णालयाप्रमाणेच आरोग्य सुविधा पुरविण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत ३४ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यासाठी १०० कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. तर गेल्या चार वर्षांत सुमारे १ लाख ३६ हजार ३१८ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे करोनाकाळातही या योजनेचा अनेकांना आधार ठरला.एकात्मिक महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात ज्या शस्त्रक्रिया खाजगी  रुग्णालयात गरजूंना परवडणाऱ्या नसतात अशा शस्त्रक्रिया करत उपचार केले जात आहेत. ठाणे जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखाली म्हणजे पिवळे व व केशरी शिधापत्रिका असलेल्या रुग्णांना योजनेतून दीड लाखांपर्यंत लाभ मिळतो. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत २०२२ मध्ये या योजने अंतर्गत सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. करोना काळातही सर्वाधिक खर्च झाला असून जिल्ह्यातील ३९ हजार ५७९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी अशा ६५ रुग्णालयामध्ये या योजनेअंतर्गत उपचार केले जात असून यातील १९ सरकारी तर ४६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेचे आयुष्यमान कार्ड वाटपाचे काम सुरू असून यासाठी जनजागृती केली जात असून मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड काढणे बंधनकारक केले आहे.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनेकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेंत १९ शासकीय रुग्णालय ४६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेसाठी आयुष्यमान कार्ड काढणे बंधनकारक केले गेले आहे.परळीचे डॉ.रवींद्र जगतकर यांनी महात्मा फुले योजनेअंतर्गत ३४ हजार रुग्णांना मिळवुन दिला शस्त्रक्रियेचा लाभ  मिळवून दिले आहे. डॉ.रवींद्र जगतकर   यांचे कार्य कौतुकस्पद आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या