💥पुर्णेतील श्री.गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जळगाव राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरास निवड...!


💥शिबिरात रासेयोतील 6 स्वयंसेवकाची पात्रतेनुसार निवड💥 

पूर्णा (दि.१४ डिसेंबर) - येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकाची  निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे आयोजित चान्सलर ब्रिगेड  राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर आव्हान -2022 होणाऱ्या शिबिरात रासेयोतील 6 स्वयंसेवकाची पात्रतेनुसार निवड करण्यात आली.

 त्यामध्ये महाविद्यालयातील काशिनाथ राष्ट्रकूट, नवनाथ कदम ,सोमनाथ ढोणे ,विठ्ठल ढोणे , कु.दिपाली मगरे कु. प्रतीक्षा गायकवाड या शिबिरा अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक प्रशिक्षण हे विद्यापीठ मार्फत  देणार आहेत. निवड झालेल्या स्वयंसेवकांचा सत्कार संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष शिवाचार्य डॉ.नंदिकेश्वर महाराज, कार्याध्यक्ष श्री प्रमोदअण्णा एकलारे, सचिव श्री.अमृतरावजी कदम, सहसचिव श्री. गोविंदराव कदम, कोषाध्यक्ष श्री उत्तमरावजी कदम जेष्ठ संचालक श्री. साहेबरावजी कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. राजकुमार , उपप्राचार्य डॉ.संजय दळवी, पर्यवेक्षक प्रा. उमाशंकर मिटकरी यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.  प्रशिक्षणसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ.पुष्पा गंगासागर, डॉ.अजय  कुऱ्हे कार्यालयीन अधीक्षक श्री.अरुण डुबेवार, श्री. वसंत कदम ,श्री बाळासाहेब कुलकर्णी, श्री शिवनकर डॉ.सोमनाथ गुंजकर उपस्थित होते महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी विदयार्थना  शुभेच्छा दिल्या......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या