💥धम्म जाग्रती सर्वांची जबाबदारी - डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो


💥पुर्णेतील बुध्द विहारात मार्गशीष पोर्णिमे निमित्त धम्मदेशना सत्कार समारंभ व खीरदान कार्यक्रम संपन्न💥

पूर्णा (दि.०७ डिसेंबर) - शहर हे धम्म चळवळीचे केंद्र आहे ठिकठिकाणी धम्म प्रचार प्रसाराचे कार्य चालु आहे धम्म परिषदा विहारे भिक्षु निर्माण होत आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म वाढविण्यासाठी धम्म जागृती साठी सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे असा धम्म उपदेश डॉ. भदत उपगुत महाथेरो पूर्णा यांनी केला आहे.

पूर्णा शहरातील बुद्ध विहारात डॉ.बी.आर आंबेडकर बुद्ध विहार समितीच्या वतीने मार्गशीष पोर्णिमेच्या निमिताने धम्मदेशना सत्कार समारभ खीरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. भदंत उपगुत महाथेरो भन्ते पंचावश श्रामणेर संघ प्रमुख अतिथी म्हणून स्टेटबॅक लिड शाखेचे प्रबंधक राम खरटमल परभणी महाराष्ट्र बकेचे प्रबंधक आंबादास फुलपगार डॉ. परमेश्वर साळवे डॉ. संघमित्रा साळवे, डॉ. बिपीनचंद्र अवसरमोल प्रमुख उपस्थिती प्रकाश कांबळे उतम खंदारे, अॅड हर्षवर्धन गायकवाड मुकूद भोळे, आशोक व्ही कांबळे, पत्रकार मंचक खंदारे दिलीप गायकवाड शामराव जोगदंडा बौद्धाचार्य त्रयंबक काबळे अतूल गवळी अमृत कऱ्हाळे आदि उपस्थित होते या निमिताने पहाटे परित्राण पाठ दुपारी १ वा पिंपळवृक्षास जल अर्पण करून भबुद्ध व डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना पुस्प सर्मपण करून अभिवादन करण्यात भिक्खु सघव प्रमुख अतिथी सत्कार करण्यात आला बुद्ध वदना त्रिशरण पंचशिल ग्रहण करण्यात आली. मान्यवरानी आपले विचार मांडले त्या सर्व उपस्थितांना स्मृतिशेष एन.डब्ल्यु गायकवाड याच्या वतीने खीरदान करण्यात आले स्मृतिशेष राजेंद्र पंडित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कपाट बुद्ध विहारास भेट्व आंबेडकर जयंती मंडळ २०१९ च्या वतीने शिल्लक रक्कमेतून चट्या भेट देण्यात आल्या यावेळी बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन त्रयंबक कांबळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेकरिता साहेबराव सोनवणे सुरज जोधळे राम भालेराव संविधान हनवते महिला मंडळाच्या पदाधिकाऱयांनी प्रयल केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या