💥भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सहकार आघाडीच्या सहसंयोजकपदी मा.आ.रामप्रसाद बोर्डीकर यांची निवड...!


💥प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शुक्रवार दि.30 डिसेंबर रोजी केली घोषणा💥 

परभणी (दि.30 डिसेंबर) : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सहकार आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीची पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज शुक्रवार दि.30 डिसेंबर 2022 रोजी घोषणा केली.

विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांची संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली असून प्रदेश सहसंयोजक म्हणून या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या व्यतिरिक्त या तेरा जणांच्या कार्यकारणीत मराठवाड्यातून अशोक जगताप यांचीही प्रदेश सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या