💥विश्वकर्मा समाज संस्थेच्या राज्य सहसचिव पदी जिंतूरचे पत्रकार राम रेघाटे यांची निवड...!


💥सदरील पत्र संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर येथील पत्रकार व हसतमुख व्यक्तिमत्व सर्वांशी मिळून घेणारे श्रीराम रेघाटे यांची विश्वकर्मा या समाज संस्थेच्या बॉडीवर राज्य सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली.

अशा आशयाचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले असून त्यांची समाज बांधव, हितचिंतक,पत्रकार मित्र व जंग-ए-अजितन्युजचे जिंतूर तालुका प्रतिनिधी बी.डी. रामपूरकर यांनी त्यांना त्यांच्या कार्यात यश येऊन दिवसेंदिवस असेच समाज उपयोगी कार्य होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

सदरील पत्र संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ व सरचिटणीस संजय सुतार यांच्या सह्याची पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या