💥परभणीत आढळलेल्या अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन....!


💥नवा मोंढा पोलीस स्टेशनचे अंमलदार पोलीस हवालदार आर.एस.मुंढे यांच्याशी मो. क्र.9307775771 वर संपर्क साधावा💥

परभणी (दि. 2 डिसेंबर) : परभणी शहरातील अनोळखी पुरुष जातीचा इसम अंदाजे  50 ते 55 वयादरम्यान  दि. 1 नोव्हेंबर, 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास खानापूर शिवारात रेल्वे रुळावर डोक्याला मार लागून मृतावस्थेत आढळून आला आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात अ.मृ.40/22 कलम 174 सीआरपीसी प्रमाणे दि. 2 नोव्हेंबर रोजी अन्वये दाखल आहे. तरी या वर्णनाच्या इसमाचा पोलीस स्टेशनला मिसींग, गुन्हा दाखल असल्यास त्याची ओळख पटल्यास नवा मोंढा पोलीस स्टेशनला कळविण्याचे आवाहन तपासिक अंमलदार पोलीस हवालदार आर.एस.मुंढे यांनी केले आहे.

इसमाचा रंग सावळा, केस पांढरे बुरकट, उंची अंदाजे 5 फुट 5 इंच, चेहरा उभा गोल, पोशाख  केसरी रंगाचे चैनचे  स्वेटर, काळ्या रंगाची पँट, उजव्या मनगटावर ओम गोंदलेले आहे. अशा वर्णनाच्या इसमाची ओळख पटल्यास संबंधीतानी नवा मोंढा पोलीस ठाणे, परभणी (मो. 9307775771)  यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलीस निरीक्षक, नवा मोंढा पोलीस ठाणे, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या