💥परभणीत बाल महोत्सव सोहळ्याचे थाटात उद्घाटन संपन्न...!💥आमदार मेघनाताई बोर्डीकर व जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आज उद्घाटन संपन्न💥


परभणी (दि.1 नोव्हेंबर) : जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत येथील प्रियदर्शन इंदिरा गांधी क्रीडा संकूलात 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवाचे मोठ्या उत्सवात आमदार मेघनाताई बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.


यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, अप्पर कोषागार अधिकारी निळकंट पाचंगे, जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष रविंद्र कात्नेश्वरकर, जिल्हा माहिला बालविकास अधिकारी कैलास तिडके, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.आमदार मेघनाताई बोर्डींकर म्हणाल्या की, खेळण्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मुले सक्षम होतात. सांघिक खेळ मुलांना समूहाने काम करण्यास शिकवतात. एकमेकांशी संवाद साधायला तसेच मतभेद दूर करण्यासाठी देखील खेळातून शिकता येते.

खेळाकडे निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले जाते. पण खेळाचे महत्त्व त्याहूनही अधीक आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. खेळ खेळल्याने सांघिक कार्य, जबाबदारी, आत्मविश्वास, जबाबदारी आणि स्वयं-शिस्तीचे धडे मिळतात. शाळेतील खेळ विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करण्यास मदत करतात. ते विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवतात आणि त्यांना त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करण्यात मदत ही करतात असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यावेळी म्हणाल्या.

प्रारंभी आमदार मेघनाताई बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वज फडकवून तसेच क्रिडा ज्योत प्रज्वलीत करुन या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिला बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केली तर जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थींनी, क्रीडा शिक्षक, जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या