💥महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेबाचे विचार जगात श्रेष्ठ - पोलिस निरिक्षक अशोकराव घोरबाड


💥सिडकोतील जेतवन बुद्ध विहारात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत बोलतांना त्यांनी प्रतिपादन केले💥


नांदेड (दि.०६ डिसेंबर) - भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व श्रेष्ठ संविधान जगाला दिले आहे. पुस्तक वाचन करूम ग्रंथ संपदा वाढविली महिलांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करावे वाईट कृत्य व्यसनापासून दुर ठेवणे आवश्यक....चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक आशोकराव घोरबाड यांनी केले सिडको नांदेड येथील जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी अभिवादन सभा व पणती ज्योत रॅलीचा समारोप प्रसंगी अभिवादन पर विचार व्यक्त केले.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे फारूख अहमद,विठल गायकवाड भारतीय बौध्द महासभेचे बि.डी.कांबळे,शहर अध्यक्ष सुभाष डोगरे,माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे,नगरसेविका चित्रा गायकवाड,राजु लांडगे,यशवत भंडारे,आशोक मगरे यांच्या सह महिला पुरुष उपस्थित होते....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या