💥सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ.युमना शिवाजी सोनवणे यांनी स्वीकारला पदभार....!


💥उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड💥

💥सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध - गोविंद सोनवणे


अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व निर्माण केले आहे. सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तसेच  उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमनवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे व पॅनल प्रमुख गोविंद सोनवणे यांनी सांगितले. 

        ग्रामपंचायत निवडणूक 2022 संपन्न झाली आणि उपसरपंच यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार सोमनवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सौ. युमना शिवाजी सोनवणे यांनी पदभार स्वीकारला तर उपसरपंचपदी राजेंद्र नारायण भोसले यांची एक मताने निवड करण्यात आली. सोमनवाडी ग्रामपंचायतही पंकजाताईंच्या ताब्यात आली आहे. सोमनवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पदभार ग्रहण आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुक्ता नारायण किडमिडे, इदुबाई वैजनाथ मुंडे, छायाबाई दत्तत्रय सोनवणे, मच्छिन्द्र माधव चाटे, वार्ड सुशीला बाबू ओटले, बाबुराव नाथराव सोनवणे सर्व सदस्य उपस्थितीत होते. 

           भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गोविंद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सोमनवाडी जनसेवा विकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सौ. युमना शिवाजी सोनवणे यांच्यासह सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. 

            परळी मतदार संघातील अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी ग्रामपंचायत या गावाला सर्वात सुंदर करून तालुक्यात विकासाचे मॉडेल म्हणून हे गाव पुढे आणण्याचा प्रयत्न असणार आहे. विकासाच्या अनेक संकल्पना व योजनां या ठिकाणी राबविण्याचे धोरण निश्चित केले असून तमाम मतदार बांधवांच्या सहकार्याने या ठिकाणी विकासकामे पूर्ण करण्यासाठी आपला पुढाकार असणार आहे.  भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली

गावच्या विकासासाठी मी वचनबद्ध असुन गावामध्ये सामाजिक सलोखा राखणार आहे. सर्व समाजाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. गावातील प्रत्येक नागरीकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी बांधिल असल्याचा शब्द नवनिर्वाचित सरपंच सौ. युमना शिवाजी सोनवणे, उपसरपंच राजेंद्र नारायण भोसले व पॅनलचे गोविंद सोनवणे यांनी यावेळी दिला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या