💥गंगाखेड तालूक्यातील महातपुरीत अवैध सावकारी प्रकरणात सहकार विभागाची कारवाई....!


💥या प्रकरणात अवैध सावकारी सिध्द झाल्यास 50 हजार दंड व 5 वर्ष कारावासाची शिक्षेची कायद्यात तरतुद - सहाय्यक निबंधक 

परभणी (दि.14 डिसेंबर) : गंगाखेड तालूक्यातील महातपुरी येथील राजुबाई संभुदेव मुलगीर व संभुदेव धोंडीबा मुलगीर यांचे घरी अवैध सावकारी संबंधाने एस.एम.कनसटवाड यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे जिल्हा निबंधक परभणी यांचे कार्यालयामार्फत कागदपत्रे तपासणी करण्याची कार्यवाही सुरु आहे. याबाबत गैरअर्जदार यांना त्यांची बाजु मांडण्याची संधी देण्यात आली असुन, यात अवैध सावकारी असल्याचे सिध्द झाल्यास महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 मधील तरतुदीनुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रकरणात अवैध सावकारी सिध्द झाल्यास रु. 50 हजार दंड व 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षेची कायद्यात तरतुद असल्याचे सावकारांचे सहाय्यक निबंधक यांनी कळविले आहे.

अवैध सावकारी संबंधाने गंगाखेड तालूक्यातील दत्तवाडी येथील एका अर्जदाराकडून प्राप्त झलेल्या तक्रारीनुसार गंगाखेड येथील सावकारांचे सहाय्यक निबंधक, संदिप तायडे यांच्या नियंत्रणाखाली राजुबाई संभुदेव मुलगीर व संभुदेव धोंडीबा मुलगीर यांचे घरी पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये शासकीय पंचाच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात पथक प्रमुख म्हणून एस. एम. कनसटवाड सहकार अधिकारी श्रेणी-2 यांनी तर पथक सदस्य म्हणुन एस. के. पवार, मुख्य लिपीक, बि.जी. देखणे, सहकार अधिकारी श्रेणी-2, जे. एस. तेरखेडकर, सहाय्यक सहकार अधिकारी, ए.एम.गोरे, बि.एस.कुरुडे, एम. के. सय्यद, एस.ए. कवळे.  ए. पी. चाकोते व पी.आर.बाजगीर यांनी कामगिरी पार पाडली.

गंगाखेड तालुक्यातील विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारे आर्थिक देवाण-घेवाणीचा व्यवहार करु नये. आवश्यकता भासल्यास परवानाधारक सावकाराकडुनच कर्ज घ्यावे. तालुक्यातील अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्ती विरूध्द कोणाची तक्रार असल्यास त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,  डॉ. गारोळे हॉस्पिटलच्या बाजुला डॉक्टर लेन, गंगाखेड या कार्यालयास संपर्क साधून पुराव्यासह तक्रार सादर करावी असे आवाहन गंगाखेड सावकारांचे सहाय्यक निबंधक संदिप तायडे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या