💥पुर्णा शहरातील महावीर नगर परिसरातील जागृक नागरिकांनी राबवली स्वयंस्फृर्तीने स्वच्छता मोहीम....!


💥या अत्यंत कौतुकास्पद स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठित नागरीक व्यापारी डॉक्टरांसह पत्रकारांची समावेश💥


पुर्णा (दि.१४ डिसेंबर) - शहरातील अत्यंत उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या भगवान महावीर नगर परिसरातील जागृक नागरिक तसेच देण समाजाच परिवार यांच्या वतीने श्रमदाना अंतर्गत आज बुधवार दि.१४ डिसेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी सन्माननीय डॉ.द्वारकादास झंवर साहेब व जेष्ठ आरोग्य तज्ञ डॉ.प्रेमचंद सोनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासन्याचे अत्यंत  कौतुकास्पद कार्य केले.


शहरातील महावीर नगर जैन मंदीरसह आसपासच्या संपूर्ण परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आल्याने संपूर्ण परिसर आज चकाचक झाल्याचे निदर्शनास आले या स्वच्छता अभियान मोहीमेत किशोरभाई लोडाया,आनंदसेठ अजमेरा,सुभाषभाई ओझा,प्रताप सिंह रामचंदानी,अनंता वळसे अनंता वळसे,नितीन भैया धामणगावे,दिलीप सेठ रामचंदानी,तुलसी सेट रामचंदानी,गोलू मातानी,बालाजी जाधव,पत्रकार सतीश टाकळकर,पत्रकार,अतुल शहाणे जब्बार सेठ थारा,मनोजजी लापसीया,प्रमोद कापसे,रवी रामचदाणी,दिलीप रामचदाणी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

देणं समाजाचं परिवार प्रत्येक बुधवारी शहरातील महावीर नगर जैन मंदिर व शनी मंदिर परिसरात श्रमदान वृक्षारोपण वृक्ष संगोपन , संवर्धनाचे कौतुकास्पद कार्य करून 'आपले शहर स्वच्छ सुंदर शहर' असा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवत असल्यामुळे या परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या