💥पुर्णेत महापुरुषांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा मानवहित लोकशाही पक्षाकडून निषेध...!


💥चंद्रकांत पाटील यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्याची निवेदनाद्वारे मागणी💥


पूर्णा (दि.१२ डिसेंबर) - शहारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आज सोमवार दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी येथे चंद्रकांत पाटील यांनी महापुरुष यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून मानवहित लोकशाही पक्ष व इतर समविचारी संघटना कडून जाहीर निषेध करण्यात आला. तसेच तहसीलदार मार्फत मा. राष्ट्रपती यांना चंद्रकांत पाटील यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ गायकवाड, मास्टर अनिल कांबळे (के. के.)डी.वाय.एफ.आय चे जिल्हा सचिव प्रा. शेख नसीर, जनजागृती सेना अध्यक्ष अनिल नरवाडे, अमन जोंधळे, दिपक बुरड, संजय अंबोरे, अजय खंदारे, सुमित वेडे, आकाश गायकवाड, सचिन गायकवाड, आदींसह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या