💥शहीद जवानांच्या मुलींनाही अनुकंपाद्वारे नोकरी ? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार....!


 💥शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीलाही अनुकंपा तत्त्वावर भारतीय सैन्यात नोकरी💥

✍️ मोहन चौकेकर 

 देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांच्या कुटुंबासाठी आता दिलासादायक बातमी संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. कारण शहीद झालेल्या भारतीय जवानाची बहीण आणि मुलींनाही आता अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी मिळू शकणार आहे. लष्करात सुरू असलेल्या सुधारणांच्या कामात केंद्र सरकारकडून पुढाकार घेतला जात आहे. 

केंद्र सरकार संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीने अहवाल सादर करून केलेल्या शिफारशीनंतर आता लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या संसदीय समितीने शहिद जवानांच्या कुटुंबातील व्यक्तीला मिळणारी नियुक्ती ही लिंगभेद न करता व्हायला हवी अशी शिफारस केली होती. त्यात "शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीलाही अनुकंपा तत्त्वावर भारतीय सैन्यात नोकरी दिली जावी", असं म्हटलं आहे.

* सध्याचा नियम काय सांगतो ? :-

आताच्या नियमांनुसार, 'जेसीओ किंवा इतर कोणत्याही दर्जाचा जवान युद्धात मारला गेला तर लष्कराकडून जवानाच्या एका मुलाला लगेचच सैन्यात नियुक्ती मिळत आहे. अजूनपर्यंत शहीद झालेल्या जवानाच्या मुलीची नियुक्ती करण्याबाबत निर्णय झालेला नसल्याने आधीपासूनच यावर प्रश्नचिन्ह आहे. म्हणजेच जर शहीद जवान अविवाहित असेल, तर त्याच्या भावाला देशसेवेची संधी मिळते पण बहिणीला ही संधी मिळत नाही.'

एवढंच नव्हे, समजा जर शहीद जवान विवाहित असेल. परंतु, त्याला मूल नसेल किंवा मुलगा नसेल, तो अल्पवयीन असेल तर त्याच्या सख्या भावाला ही संधी दिली जाते. परंतु, त्याने शहिदाच्या विधवा पत्नीशी लग्न करावं अशी अट आधीपासूनच आहे. सध्याच्या नियमांमुळे या योजनेचा लाभ सर्व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळत नाही. म्हणून संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीनं या मुद्द्यावर बराच विचार केल्यानंतर नुकताच आपला अहवाल सरकारला सादर केला आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या