💥सेनगाव तालुक्यातील साखरा येथ राष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापण करा...!


💥साखरा येथील ग्रामस्थांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥 

✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथेराष्ट्रीयकृत बँकेची शाखा स्थापनकरावी,अशी मागणी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कडे रविवारी दि 04/12/2022 रोजी साखरा येथील  ग्रामस्थांच्या वतीने  निवेदनाद्वारे मागणी  केली आहे या वेळी उपस्थितीत .आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार अॅड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, हिम्मत राठोड,नागनाथ धानोरकर, सतीश कांदे,दीपक चाकोते यांनी दिलेल्या निवेदनात नमूदकेले आहे की, साखरा हें बाजारपेठेचेगाव आहे. जवळपास ४० गावांचा येथे संपर्क असतो. येथे पूर्वी स्टेटबँक हैद्राबादची शाखा होती.आत्ता ती शाखा सेनगाव येथे स्थलांतरकरण्यातआली.त्यामुळे या भागातील गावांना राष्ट्रीयकृत बँकेत व्यवहार करण्यासाठी तालुकाअथवा जिल्हा गाठावा लाग.यात वेळ व पैसा खर्च होतो.

अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे या भागातील जनतेची अनेक दिवसांपासून साखरा येथे बँकेची शाखा कार्यन्वित व्हावी त्यासाठी अनेक वेळानिवेदनेसुद्धा दिली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे निवेदनात नमूदआहे. दरम्यान,मागणीचा सकारात्मक विचारकरण्याची ग्वाहीडॉ.केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या