💥नाशिक शहरातील गंगापूर रोड भागातील पान टपरीतून हुक्का साहित्य जप्त.....!


💥शहर गुन्हे शाखा एकच्या पथकाची धाडसी कारवाई💥

नाशिक : शहर गुन्हे शाखा एकच्या पथकाने गंगापूर रोड भागातील एका पान टपरीतून हुक्का विक्रीसाठी ठेवण्यात आलेला बेकायदेशीर साठा जप्त केला.

सहाय्यक पोलीस उप निरीक्षक रवींद्र बागुल यांना मिळालेल्या माहिती नुसार पथकाने नेर्लेकर सर्कल येथील जय गणेश स्टोअर्स मधून प्रतिबंधित ई सिगारेट, तसच तंबाखूयुक्त हुक्क्याचे पाउच,हुक्का पॉट पॉइंट,ब्राऊन पेपर, असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी प्रकाश राजाराम जाधव यास अटक करून गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक विष्णू उगले,रवींद्र बागुल, असिफ तांबोळी,नझिम पठाण,प्रशांत मरकड, विशाल देवरे यांनी ही कामगिरी बजावली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या