💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून वेधले लक्ष💥
परभणी (दि.22 डिसेंबर) : पूर्णा नदीवरील चार उच्च पातळीच्या बंधार्यांच्या प्रस्तावांना तांत्रीक मान्यता मिळविण्याकरीता राज्यस्तरीय तांत्रीक सल्लागार समिती नाशिक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतून दिली.
या नदीवरील उच्च पातळीच्या बंधार्यांच्या प्रस्तावासंदर्भात आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णा नदीवरील परभणी जिल्ह्यातील ममदापूर, हिंगोली जिल्ह्यातील कोटा व जोडपरळी व पिंपळगाव कुटे या चारही उच्च पातळी बंधार्यांच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव छाननीकरीता राज्यस्तरीय तांत्रीक सल्लागार समिती नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता व नाशिकच्या समितीद्वारे शिफारस प्राप्त झाल्यापाठोपाठ महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधीकरण (एमडब्लूआरएए) यांची मान्यता आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु आहेत. प्रशासकीय मान्यता प्रस्तावात प्राप्त झाल्यापाठोपाठ प्रकल्पासाठीचे भूसंपादन, सविस्तर अंदाजपत्रकास तांत्रीक मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करुन क्षेत्रीय स्तरावर कामे पूर्ण करण्याचे नियोजन केले जाईल, असे फडणवीस यांनी विधानपरिषदेतून स्पष्ट केले.
0 टिप्पण्या