💥गोवर - रुबेलाच्या लसीपासून एकही बालक वंचित राहू नये - जिल्हाधिकारी आंचल गोयल


💥परभणी जिल्ह्यात दि.15 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 दरम्यान विशेष लसीकरण मोहीम💥

परभणी (दि.09 डिसेंबर): राज्यातील काही जिल्ह्यात गोवर-रुबेलाचा उद्रेक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे तसेच गोवर आणि रुबेलाबाबत पालकांनी घाबरून न जाता बालकाची लसीकरण स्थिती अवलोकन करून काळजी घ्यावी. तसेच आरोग्य यंत्रणेने 15 ते 25 डिसेंबरदरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबवित आहे. त्यात जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिले.


गोवर रुबेला लसीकरण उद्रेक सर्वेक्षण व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी श्रीमती गोयल यांनी संबंधित यंत्रणेला आदेश‍ दिले.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) डॉ. विशाल जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, डॉ. किशोर सुरवसे, मनपाच्या डॉ. कल्पना सावंत यांच्यासह जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

 गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी सर्वेक्षण करून लसीकरणापासून वंचित नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांची यादी प्रत्येक स्तरावर उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यात 15 ते 25 डिसेंबरदरम्यान विशेष लसीकरण मोहिमेचे सूक्ष्म नियोजन करून लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश श्रीमती गोयल यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. आतापर्यंत लसीपासून वंचित  बालकांचे 100 टक्के लसीकरण करावे व विशेष लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवावी, असे त्यांनी सांगितले.

गोवर लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. गोवरचा आजार लहान मुलांना होऊ नये, यासाठी बालकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक असून महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेने अधिक सक्रिय होण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच आतापर्यंत जन्मलेली बालके, पात्र बालकांचे झालेले लसीकरण आणि विहित कालावधीत लसीकरण पूर्ण करण्याबाबतची संपूर्ण माहिती पुढील आठवड्यात सादर करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला दिलेत.   

 एक डिसेंबर 2017 पासून पुढे जन्म झालेल्या बालकांच्या पालकांनी विशेष लक्ष देऊन लसीकरण स्थितीचे अवलोकन करावे व त्याचे लसीकरण झाले नसल्यास 15 ते 25 डिसेंबरदरम्यान आयोजित विशेष लसीकरण शिबिराच्या ठिकाणी आशा, आरोग्य कर्मचा-यांकडून लस घ्यावी तसेच गोवरसदृष्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

💥गोवर व रुबेलाची लक्षणे :-

गोवर -  सौम्य लक्षणे सर्दी, ताप, खोकला, लाल रंगाचे पुरळ येणे आरोग्याची गुंतागुंत, निमोनिया, अतिसार, अंधत्व, मतिमंदत्व, डोळे लाल होणे, अशक्तपणा, अंग दुखणे

रुबेला - आजारामुळे गर्भावस्थेच्या काळात संक्रमणामुळे नवजात बाळ जन्मजात दोषासह जन्माला येऊ शकते. त्यात आंधळेपणा, बहिरेपणा, जन्मजात हृदयाचे आजार....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या