💥गावच्या सर्वांगीण विकासासाठी संत केदारेश्वर संत सेवालाल ग्राम विकास पॅनलला मतदान करा - प्रभाकर राठोड


💥गाव ताड्यावरील विकास कामे करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवार मतदारांच्या घरी जाऊन प्रचार करत आहेत. तालुक्यातील लमाण तांडा येथील संत केदारेश्वर संत सेवालाल ग्रामविकास पॅनल ला प्रतिसाद दिसत आहे. सरपंच पदाचे उमेदवार सौ. पार्वतीबाई प्रभाकर राठोड तसेच, वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार राजेभाऊ मधुकर भांगे ,सौ. कल्पना प्रल्हाद सानप ,सौ.गंगाबाई भास्कर गित्ते आदी उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे.लमाण तांड्यावरील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारामध्ये इतर पॅनलच्या तुलनेत गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे पॅनल प्रमुख प्रभाकर राठोड, मधुकर भांगे यांनी प्रचारामध्ये असल्याचे सांगितले. 

गाव ताड्यावरील विकास कामे करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही विकास कामांसाठी निधी मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून  गावच्या तांड्यावर नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत केदारेश्वर संत सेवालाल ग्राम विकास पॅनल कटिबद्ध आहे. संत केदारेश्वर संत सेवालाल ग्रामविकास पॅनलचे प्रमुख प्रभाकर राठोड, मधुकर भांगे,सुशन बापूराव डोंगरे, महादेव पिराजी सानप भास्कर गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली संत केदारेश्वर संत सेवालाल पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. एकच ध्यास, फक्त विकास  हे ध्येय ठेवून विकास करण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.तालुक्यात आदर्श ग्राम पंचायत म्हणून, नावलौकिक मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे. गावच्या विकासासाठी येत्या 18 डिसेंबर रोजी संत केदारेश्वर संत सेवालाल ग्रामविकास पॅनल मतदान करण्याचे आवाहन प्रभाकर राठोड, मधुकर भांगे,सुशन बापूराव डोंगरे, महादेव पिराजी सानप, भास्कर गित्ते यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या