💥परभणी जिल्ह्यात संरक्षित केलेल्या क्षेत्रानुसार शेतकऱ्यांना पीक विमा वाटप...!


💥असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे💥

परभणी (दि.1 नोव्हेंबर) :  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पीक विमा कंपनीकडे भरलेल्या शेतकऱ्याने पीक विमा भरून संरक्षित केलेल्या क्षेत्रानुसार त्या शेतकऱ्यास पीक विमा वाटप करण्यात आला असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 


पीक विमा कंपन्यांबाबत शेतकऱ्यांनी विविध मार्गाने विमा रकमेबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे सर्वेक्षण करुन त्यांच्या खात्यावर कंपनीकडून पीक विमा रक्कम वाटप करण्याचे काम चालू आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन निर्णयानुसार विमा रक्कम एक हजार रुपयांपेक्षा कमी जमा झाल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या. परंतु शेतकऱ्याने एक पिक विमा पावतीवर (पिक विमा आयडी) एकापेक्षा जास्त पिकाचा पिक विमा भरून सर्व पिकाचे नुकसान झाल्याबद्दल तक्रार दाखल केली असेल तर शासन निर्णयानुसार त्या शेतकऱ्यास एक हजार रुपयापेक्षा कमी पीक विमा रक्कम खात्यात जमा करण्यात येत नाही. परंतु सर्व पिकाचे मिळून रक्कम एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त होत असतील तर ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या