💥पुर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात उपप्राचार्य प्रा.संजय दळवी यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर निवड...!


💥या निवडी बद्दल त्यांचे श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदजी एकलारे यांनी अभिनंदन केले आहे💥

पूर्णा. (दि.०१ डिसेंबर) - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नुकत्याच विद्या परिषद, सिनेट तसेच विविध अभ्यास मंडळाच्या निवडणूक पार पडल्या. यामध्ये श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रा. संजय दळवी  विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळावर बहुमताने विजयी झाले. प्रा. अंबादास कदम, प्राचार्य डॉ डी.यू.गवई,डॉ श्रीरंग बोडके, तसेच प्राचार्य डॉ अशोक गवते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संजय दळवी यांनी सदरील निवडणूक लढवली होती. डॉ सुनील मोदक, डॉ साहेब शिंदे, डॉ दयानंद जाधव, डॉ विशाल मराठे, डॉ राजेश देशमुख यांनी दळवी सरांच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

श्री गुरु बुद्धीस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष श्री प्रमोदजी एकलारे, संस्थेचे सचिव अमृतराजजी कदम, सहसचिव श्री गोविंदरावजी कदम तसेच कोषाध्यक्ष श्री. उत्तमरावदादा कदम आणि प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी प्रा दळवी सरांचे विशेष अभिनंदन केले.  श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयातील स्थानिक स्वामुक्टा संघटने तर्फे संघटनेचे सचिव डॉ विजय पवार आणि उपाध्यक्ष डॉ राजीव यशवंते,  वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्टाफ सेक्रेटरी प्रा पांडुरंग भुताळे, कनिष्ठ महविद्यालयीन विभागातर्फे अनुशलव शेजुळ, डॉ वेंकट कदम, व्यावसायिक अभ्यासक्रम विभागातर्फे प्रा. शहेनशहा शेख , प्रा चारुदत्त डाफने, प्रा. वाघमारे, प्रा. पंडित  तसेच कार्यालयीन कर्मचारी संघटने तर्फे श्री अरुण डुब्बेवार आणि श्री बाळासाहेब कुलकर्णी, या सर्वानी प्रा दळवी सरांचा महाविद्यालयात  भव्य सत्कार  केला. वनस्पतीशास्त्र विषयातील विविध महाविद्यालयात कार्यरत असलेल्या सर्व प्राध्यापक मंडळींनी डॉ संजय दळवी यांचे अभिनंदन केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या