💥जागतिक एड्स दिनानिमित्त महामार्ग चौकीत वाहनचालकांची आरोग्य व रक्त तपासणी.....!


💥वैद्यकिय अधिक्षक डॉ. चाडंगे व पोलीस निरीक्षक केंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : येथील महामार्ग पोलीस व आरोग्य विभाग यांच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त महामार्ग चौकी वर वाहनचालकाची तपासणी करण्यात आली.


वैद्यकिय अधिक्षक डॉ. चाडंगे व पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शन खाली महामार्ग पोलीस चौकी येथे वाहनचालकाची रक्त व आरोग्य तपासणी करण्यात आली या ठिकाणी मोफत समुपदेशन, गरजे प्रमाणे संदर्भ सेवा, एच आय व्ही व्यक्तीशी असुरक्षित संबंध, गुप्तरोग, टिबी, या विषयी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वाहनचालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चव्हाण व्हि बी, खातेद देशमुख, संदिप येडकेवार, निलेश दातार, सविता कांबळे, अमोल राठोड, फौजदार कदम, पो.ह गुरसुडकर, होमगार्ड रोकडे, घोगरे अदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या