💥परभणी जलसंधारण विभागातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा यांना निलंबीत करा...!


💥संभाजी सेना आक्रमक उपविभागीय जलसंधारण अधिकारी कच्छवा यांच्या विरोधात जोरदार धरणे आंदोलन💥

परभणी (दि.21 डिसेंबर) : जलसंधारण विभागातील उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा यांच्या तब्बल सात वर्षांपासूनच्या कारकिर्दीतील तक्रारींची चौकशी करावी व त्याद्वारे निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी संभाजी सेनेच्या संतप्त पदाधिकार्‍यांनी करीत जोरदार धरणे आंदोलन केले.

            या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना एक तपशीलवार निवेदन सादर केले. त्याद्वारे प्रशांत कच्छवा हे मूळ जलसंपदा विभागाचे अधिकारी आहेत. विशेषतः ते मूळ परभणी जिल्हावासीय आहेत. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्यांची बदली परभणीवरुन अन्यत्र करणे गरजेचे आहे. असे असतांनासुध्दा जलसंपदा विभागाद्वारे गेल्या सात वर्षात त्यांच्या नियुक्तीकडे पूर्णतः कानाडोळा केला.

           दरम्यान, कच्छवा यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ धामोडा नाला खोलीकरणाच्या कामातही कच्छवा यांनी मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केले. त्या विरोधातही तत्कालीन सचिवांद्वारे चौकशी सुरु आहे  परंतु, आजतागायत कारवाई झाली नाही. शासन स्तरावरुन या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही, अशी खंत व्यक्त करीत संतप्त पदाधिकार्‍यांनी जोरदार धरणे आंदोलन केले.

           संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्‍वर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या