💥चिखली येथे माँ जिजाऊ वधू वर सुचक केंद्र आयोजित भव्य सकल मराठा समाजाचा वधू-वर व पालक परिचय मेळावा....!


💥या मेळाव्यात नाव नोंदणी वधू वर व थेट भेट परिचय होणार💥

✍️ मोहन चौकेकर 

[मेळाव्याला खान्देश,मुंबई, पुणे,सोलापूर,बीड,औरंगाबाद,नागपूर. अमरावती,अकोला,यवतमाळ,नांदेड,परभणी येथुन सातशे च्यावर वधू-वर पालक परिचयासाठी येणार आहेत]

चिखली : चिखली येथे दि ४ डिसेंबर २०२२ रोजी वार रविवार सकाळी १० वाजता सकल मराठा  समाजाचा  वधू वर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे सदर मेळावा जैस्वाल मंगल कार्यालय खामगाव रोड चिखली. जिल्हा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याचे संस्थापक अध्यक्ष  वैभव भाऊराव पाटील पवार तसेच डॉक्टर गणेश देशमुख,प्रमोद पाटील,शिवाजीराव काटे , गिताराम तायडे. अमित जाधव. ईश्वर वाघ , संजय पांचाळ , प्रवीण ठोसरे ,अनिल तुपकर , सुनील रिंढे , सतीश गावंडे, अॅड. राजेंद्र ठोसरे. नारायण देशमुख, गणेश भोसले यांचेकडून या मेळाव्याचे नियोजन व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यासाठी संस्थापक अध्यक्ष व आयोजक मां श्री वैभव भाऊराव पाटील पवार  यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्वदूर संपर्क दौरा सुरू केला आहे त्यासाठी पाहणी परिचयातुन मेळाव्यातच ३० ते ४०विवाह मार्गी कसे लागतील यासाठी सुध्दा आयोजकांचा प्रयत्न असणार आहे. 

* या मेळाव्यात नाव नोंदणी वधू वर व थेट भेट परिचय होणार :-

मेळाव्यात हुंडा, कुंडली, गुण, मंगळ यावर मान्यवर, समाजाला प्रबोधन करणार आहेत पालकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी हजारो स्थळे पाहण्याची संधी उपलब्ध  होणार आहे.त्यासाठी यामधे  जास्त नावे होण्यासाठी वधु-वर व पालक मेळावा समिती मधील  अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य  हे प्रयत्न करणार आहे.  वधू-वर व पालक यांनी जास्तीत जास्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या