💥हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार,अंबादास दानवेंनी घेतली अध्यक्ष,उपाध्यक्ष उपसभापतींची भेट..!


💥महाविकास आघाडी व इतर मित्रक्षांची अधिवेशना संदर्भात आढावा बैठक नागपूर येथे पार पडली💥


✍️ मोहन चौकेकर 

नागपूर : - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे, विधानपरिषद उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची विधानसभा अध्यक्षांच्या नागपूर येथील विधानभवनातील दालनात विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.


तसेच आज नागपूर विधानभवनातील नवीन इमारतीचे उद्घाटन आज विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, उपसभापती निलमताई गोऱ्हे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार व विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी व इतर मित्रक्षांची अधिवेशना संदर्भात आढावा बैठक नागपूर येथे पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची भूमिका मांडली. या बैठकीत नंतर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित चहापाणी कार्यक्रमावर दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी सर्वानुमते बहिष्कार दाखवला सत्तेत येऊन ६ महिने झाले तरी सरकारकडून जनतेच्या प्रश्नांबाबत अपेक्षाभंग झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जनतेच्या विविध प्रश्नांबाबत  मविआकडून लेखी निवेदन देण्यात आले......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या