💥मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


💥जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले अर्ज करण्याचे आवाहन💥

परभणी (दि.08 डिसेंबर): मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गंत वैयक्तिक शेततळ्यांसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांनी केले आहे. 

शेततळे हा पाणलोटावर आधारित जलसंधारणांच्या उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढविणे आणि शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राबविण्यात येत आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या नावावर दीड एकर शेती असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गंत अनुदानाची कमाल मर्यादा ही विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी 75  हजार रुपये इतकी असून, यंत्राव्दारे ईनलेट, आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रँपसह शेततळे राहणार आहेत. 

सर्वसाधारण क्षेत्र, आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्रात राबविता येणार आहे. त्यासाठी जास्तीत -जास्त ईच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी या घटक योजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत किंवा जवळच्या कृषि कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या