💥विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली येलदरी कॅम्प अंतर्गत सावंगी (म्हाळसा) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट....!


💥जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी अचानक भेट देवून नवीन इमारतीची पाहणी केली💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील येलदरी कॅम्प येथील जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली असून या इमारतीची पाहणी मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी येलदरी कॅम्प येथे येऊन नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला जिप शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कृष्णा गजानन चव्हाण याने  विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला यावेळी विभागीय आयुक्तांनी सदरील विद्यार्थ्याचे कौतुक केले तसेच सावंगी म्हाळसा येथील माजी सरपंच प्रमोद चव्हाण यांनी येथील आदर्श शाळे ची नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारती कडे आपले ध्यान द्यावे अशी विनंती विभागीय आयुक्तांना केली आहे.

 याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य ती दखल घेतली जाईल असे आश्वासन केंद्रेकर यांनी दिले. येलदरी कॅम्प येथील जिल्हा परिषद शाळेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे प्राथमिक शिक्षण झालेले असून त्यांचे वडील येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. यावेळी त्यांनी येलदरी गावाबद्दलच्या जुन्या आठवणींना  उजाळा दिला यावेळी या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पीपी चव्हाण सहित गावातील प्रतिष्ठित नागरिक वसंतराव चव्हाण, त्रंबकराव चव्हाण, गुलाबराव चव्हाण, प्रवीण मुळी, महेंद्र लाटे, सरपंच संदीप चव्हाण,शाळा समिती चे अध्यक्ष गजानन चव्हाण, दत्ता नवले, महेश चव्हाण, दीपक चव्हाण, रमेश कं ठाळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी येथील नागरिकांनी विविध समस्या विभागीय आयुक्त केंद्रेकर यांच्या कडे मांडल्या त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल असे अस्वासन त्यांनी दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या