💥'माणूस' म्हणून वावरणारे.....समाधानभाऊ सावळे (भाऊ पाटील)....!

 😥


💥माणसांच्या गोतावळ्यात,जोडलेल्या माणुसकीच्या शृंखलेतून निघून गेले भाऊ💥

_‘माणूस’ म्हणून वावरणारा,_

_माणसा-माणसात मित्र शोधणारा,_

_प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणारा,_

_जिजाऊंच्या लेकींसाठी सैनिकी शिक्षण आणणारा,_

_विदर्भातील एकमेव मुलींची सैनिकी शाळा चालविणारा,_

_पत्रकारीतेत स्वतःला सिध्द करुन दाखविणारा,_

_बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा मार्गदर्शक,_

*अन् सर्वात महत्वाचं..*

_डोंगरशेवली गावातून बुलडाण्यात येवून,_

_शून्यातून विश्व निर्माण करणारा.._

*जिवाभावाचा माणूस*

अर्थात *समाधानभाऊ सावळे*

_अर्थात सर्वांचे भाऊ पाटील.._

_जिजाऊ सैनिकी शाळेतील मुलींचे लाडके भाऊसाहेब!_

*समाधानभाऊ सावळे..*

_यांचा गत १५/२० दिवसांपासून संघर्ष सुरु  होता जीवन-मरणाशी._

_अनेकांना ‘जीवन’ देणारा हा ‘माणूस’ मुंबईच्या ग्लोबल हॉस्पीटलमध्ये मृत्यूशी झुंज होता....यकृताचा आजार जडला होता मुलगा विवेक (विकी) त्यांना स्वतःचं यकृत देण्यासाठीही तयार होता पण इन्फेक्शन कमीच होत नसल्यामुळे ट्रान्सपरंटची वेळ आली नाही.

मध्ये भाऊंच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याच्याही बातम्या होत्या, गुरुवार १ डिसेंबर रोजी दवाखान्यात जाऊन त्यांची भेटही घेतली.. त्याचवेळी तब्येत खूप क्रिटिकल असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

आज सकाळीच भाऊ गेल्याचे त्यांचा भाचा शरदने रडत सांगितले, आणि मित्राच्या गोतावळ्याचा बांधच फुटला..कारण भाऊ म्हणजे ‘एक’ व्यक्ती नव्हते, तर मित्रत्वाची एक संस्था होते..

लाखांचे पोशिंदे होते!

_एवढ्या ऐश्वर्यातही खटारा झालेली ३५ वर्षांपूर्वीची ‘हिरो होंडा CD100’ ही मोटारसायकल, जपून ठेवणारा सहृदयी माणूस होता तो. त्यावर पुढे लिहिलेले_ 'माणूस'अन् त्या माध्यमातून त्यांच्यातला जीवंत असलेला माणूस....हीचतर होती खरी माणूसपणाची प्रेरणा!

_दुःख एक माणूस गेल्याचे नाही,_

_माणसं जोडणारा गेल्याचे आहे.._

आई पाठोपाठच ९ महिन्यात कर्तबगार  मुलगा जावा, हा सावळे परिवारावर पहाड कोसळल्याचं अतिव दुःख आहे..

उषाताईंचा जीवनसाथी.. किरण, राहुल व विवेकचे लाडके पप्पा तर डुग्गु व रेवा या नातींसाठी जिवातला जीव असणारा आजोबा, सैनिकी शाळेतल्या मुलींना लेकीसम जीव लावणारे भाऊसाहेब मित्रांच्या माळेतला मुकुटमणी कायमचा निघून गेला.. सर्वांना असा अकाली सोडून!_

आज मोक्षदा एकादशी,

 *स्व. भाऊंना मोक्षमय श्रद्धांजली*🙏

 *राजेंद्र काळे*

  बुलडाणा - ९८२२८९९९२३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या