💥पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन...!


💥या मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेत किशोरवयीन मुलींना डॉ.सौ.आशा चांडक यांनी केले मार्गदर्शन💥

💥या कार्यशाळेत 160 मुलींना मार्गदर्शन व मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप💥

पुर्णा (दि.15 डिसेंबर) - तालुक्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद शाळेत दि.15 डिसेंबर गुरुवार रोजी किशोरवयीन मुलींसाठी 'मासिक पाळी व्यवस्थापन' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी इयत्ता 7 वी ते 10 इयत्ता 10 वीतील किशोरवयीन मुलींना डॉ.सौ.आशा चांडक यांनी केले मार्गदर्शन केले या कार्यशाळेचे आयोजन होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएचआरसी) या संस्थे तर्फे करण्यात आले होते. 


या प्रसंगी 160 किशोरवयीन मुली व शिक्षकांची उपस्थिती होती या कार्यक्रमात डॉ सौ आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना ऋतुप्राप्ती झाल्यावर पौगंडावस्थेतील होणारे शारीरिक व मानसिक बदल, मासिक पाळी व्यवस्थापन, पाळी विषयीचे समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा  वापर, त्याची योग्य विल्हेवाट, पाळीत घ्यावयाचा योग्य पोषक आहार, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस, अतिरक्तस्राव तसेच पाळीमध्ये वापरण्यासाठी शाश्वत पर्याय अर्थात शोषक म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले. 

बालविवाह प्रतिबंधक कायदा जनजागृती विषयी बोलतांना डॉ आशा चांडक म्हणाल्या "एक सुदृढ बालकास जन्म देण्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. 18 वर्षा पूर्वी तुमची शारीरिक व मानसिक वाढ पूर्णपणे झालेली नसते तसेच स्त्री प्रजनन संस्थेचा पूर्णपणे विकास होण्यासाठी 18 वर्ष पूर्व व्हावे लागते. त्यासाठी मुलींनी 18 वर्षाच्या आधी विवाह करू नये."

या समुपदेशन सत्रात 160 विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे व  सॅनिटरी पॅड पॅकेटचे वाटप करण्यात आले तसेच मुलींसाठी 'मेन्स्ट्रुपेडिया' या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी किशोरवयीन मुलींना 'कोणतेही सण, धार्मिक कार्य किंवा यात्रा आहे म्हणून मासिक पाळी लांबविण्याच्या गोळ्या न खाण्याची व स्त्रीत्वाचा सन्मान राखण्याची शपथ देण्यात आली" प्रास्ताविक श्री सचिन ठोंबरे  यांनी केले. 

या कार्यशाळेस मुख्याध्यापक श्री काळे पी पी, सौ छाया गायकवाड, प्रेमेंद्र भावसार आदींची उपस्थिती होती. तर  या कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, क्षितिजा तापडिया यांनी प्रयत्न केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या