💥हिंगोलीत आदर्श महाविद्यालय परिसरात असलेल्या झाडांची कत्तल सुरूच....!


💥झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेतली की नाही हा प्रश्नही निर्माण💥

हिंगोली : आदर्श महाविद्यालय परिसरात असलेल्या सुमारे १०० झाडांची आतापर्यंत महाविद्यालय प्रशासनाने कत्तल केली आहे. एकीकडे झाडे लावण्याची मोहीम सुरू असताना हे महाविद्यालय मात्र रोजच झाडे तोडून टाकताना दिसत आहे. याच महाविद्यालय परिसरात असलेले अत्यंत उंच काटे शेवराचे झाड दीड वर्षांपूर्वी तोडून टाकले आहे. त्यानंतर सुरू झालेली झाडांची कत्तल थांबता थांबेना. याबद्दल महाविद्यालय प्रशासनावर कारवाई होणे आवश्यक आहे. झाडे तोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेतली की नाही हा प्रश्नही निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या