💥औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध.....!


 💥सूचना व हरकती 3 जानेवारी 2023 पर्यंत स्विकारणार💥 

परभणी (दि.23 डिसेंबर) : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक 2023 करिता मतदान केंद्राची प्रारूप यादी शनिवार (दि. 24) रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सदरची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदार यांच्या कार्यालयात मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सदरची प्रारूप यादी https://parbhani.gov.in/ या संकेतस्थळावरही मतदारांना पाहण्यासाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी सांगितले. 

मतदान केंद्राच्या प्रारूप यादीसंबंधी हरकती व सूचना यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसापर्यंत (दि. 03 जानेवारी 2023) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करता येणार आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या