💥विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न..!

  


 💥शिबिरात जवळपास ४३ च्या वर सदस्यांनी रक्तदान केले💥       

 ✍️ मोहन चौकेकर 

संभाजीनगर : संपूर्ण जगात ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते आमदार  अंबादासदादा दानवे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वार्ड क्रमांक दोन भगतसिंग नगर येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सौ. प्रतिभा राजपूत  यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे नागरिकांना अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आले. शिबिरात जवळपास ४३ च्या वर सदस्यांनी रक्तदान केले. शिवसेनेच्या वतीने सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय कामगार सेनेचे मरवाडा सचिव  प्रभाकर मते पाटील, विधानसभेचे  रजान लाड भारतीय कामागार सेना चिटणीस वरळी विधानसभा मुंबई तसेच  उपशहर प्रमुख संजय हारणे बाळासाहेब औताडे ,गोरख बापु औताडे , सचिन आहेर सरचिटणीस मुंबई साजिद खान,दिनेश राजपूत, रजित राजपूत, कट्यार सिंग राजपुत विष्णु राजपूत यांच्यासह हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवसेना उपशहर प्रमुख  संजय जी हरणे तसेच लिलत देशपांडे विभाग प्रमुख, प्रविण शिंदे,  अभ्यंगत समिती सदस्य शिवसेना महिला आघाडी अपर्णाताई रामावत उपशहर प्रमुख ,रंजना कोलते, विभाग प्रमुख सुनिता गरूड, मनिषा पाटील, सुनिता भारोडकर, सुनिता जाधव राजश्री वर्मा, भारती काकडे यांच्यासह सर्व शिवसेना, युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या