💥पुर्णेत ६६ वा महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन....!


💥६ डिसेबर रोजी डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन💥

पूर्णा (दि.०४ डिसेंबर) - येथे भारत रत डॉ. बाबा साहेब आंबेडकर याच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमिताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन ६ डिसेबर रोजी डॉ.बी.आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभा याच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमिताने सकाळी ९:१५ वा डॉ. आबेडकर चौक पूर्णा येथे अभिवादन व श्रीकांत हिवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अर्ध्या वर उतरविण्यात येईल त्या नंतर दुपारी १२:३० वा. बुद्ध विहार येथे त्रिशरण पंचशिल बुद्ध वंदना ' डॉ. बाबा साहेब आबेडकर याच्या प्रतिमेची शोक मिरवणूक बुद्ध विहारा पासुन शहराच्या मुख्य रस्त्यावरून डॉ. आंबेडकर चौक विर्सजन करण्यात येईल त्या आगोदर गायक प्रकाश जोधळे आणि त्याचा सचाचे अभिवादन पर गीत गायन होणार आहे दु १:१५ वा डॉ. आंबेडकर चौक येथे अभिवादन शोक सभा होणार आहे. या शोक सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष गटनेते उत्तम खंदारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदत डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते पंयावंश भन्ते पंत्र्यादिप व श्रामणेर संघ प्रमुख वक्ते म्हणून प्रा.एम.एम. सुरनर गंगाखेड प्राचार्य डॉ.के. राजकुमार पूर्णा तहसिलदार पल्लवी टेमकर आदि उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत या अभिवादन सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. बी.आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभा शहर तालुका शाखा व महिला मडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या