💥पुर्णा तालुक्यातील फुलकळस येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.....!


💥शेतकरी गणेश घोडेकर हे काही दिवसापासून शेतीच्या बँकेच्या कर्जामुळे चिंतेत होते💥 

पुर्णा (दि.०७ डिसेंबर) - तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील फुलकळस येथील शेतकरी गणेश विश्वनाथ घोडेकर वय वर्ष ६५ वर्षे यांनी त्यांच्या माखणी शिवारातील शेतात आज बुधवार दि.०७ डिसेंबर रोजी दुपारी १२-०० वाजेच्या दरम्यान शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

शेतकरी गणेश घोडेकर हे काही दिवसापासून शेतीच्या बँकेच्या कर्जामुळे चिंतेत होते व शेतमालाचे उतरलेले भाव त्यामुळे अधिक चिंताग्रस्त होते अखेर त्यांनी माखणी शिवारातील त्यांच्या शेतात गट नंबर 173 मधील लिंबाच्या झाडास दोरीच्या साह्याने बाराच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना शेजारी व्यक्तींनी ताडकळस पोलीस ठाण्यात दिली असता ताडकळस पोलीस व फिर्यादी त्यांचाच मुलगा गंगाधर गणेश घोडेकर यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली पुढील तपास विजय राठोड व गणेश लोंढे रामकिसन काळे  करत आहेत त्यांचे शवइच्छेदन प्राथमिक आरोग्य केंद्र ताडकस येथे वसंत कांबळे यांनी केले व त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या