💥पुर्णा तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर....!💥प्रस्थापितांना बगल देत अनेक गावात मतदारांनी घडवला बदल💥


पुर्णा (दि.२० डिसेंबर) - तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली १३ ग्रामपंचायतीं पैकी गोविंदपूर (मरसूळ) व मुंबर ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली व मुंबर ग्रामपंचातीच्या सरपंच पदावर अनंता धोंडीबा शिंदे तर गोविंदपूर ग्रामपंचायत सरपंच पदावर नितीन शंकरराव लोखंडे हे बिनविरोध सरपंच झाले तर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींसाठी दि.१८ डिसेंबर रोजी मतदान झाले होते ज्या मतांची आज मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी मतमोजनी झाली.


पुर्णा तहसिल कार्यालयात आज मंगळवार दि.२० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास ११ ग्रामपंचायत निवडणूकीतील मतमोजनीस सुरुवात झाली होती या अकरा गावातील सरपंचांची जनमतातून निवड झाली यात तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायत सरपंच पदावर मोतीराम तुकाराम गायकवाड (अनुसुचित जाती प्रवर्गातून),सोनखेड ग्रामपंचायत सरपंच पदावर मुक्ताबाई सोपान सुर्यवंशी (सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून),पिंपरण ग्रामपंचायत सरपंच पदावर पिराजी मारोती सोनटक्के (सर्वसाधारण प्रवर्गातून),गौर ग्रामपंचायत सरपंच पदावर चंद्रकांत संभाजी सावळे (अनुसुचित जाती प्रवर्गातून),धनगर टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदावर मिराबाई हरिभाऊ साखरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव),कानखेड ग्रामपंचायत सरपंच पदावर सुमन मारोती बखाल (सर्वसाधारण स्त्री राखीव),रुपला ग्रामपंचायत सरपंच पदावर मिराबाई गोपिनाथ गंगावळे (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव),पिंपळा लोखंडे ग्रामपंचायत सरपंच पदावर मनिशा मारोती लोखंडे (सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्ग),पांगरा लासीना ग्रामपंचायत सरपंच पदावर उत्तम शेषराव ढोणे (सर्वसाधारण प्रवर्ग),निळा ग्रामपंचायत सरपंच पदावर प्रतिभा गोविंद सुर्यवंशी (सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्ग),दगडवाडी ग्रामपंचायत सरपंच पदावर गंगासागर मुंजाजी वाघमारे (सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्ग), आदी सरपंच पदावर निवडून आले असून तालुक्यातील जनसामान्यांचे लक्ष असलेल्या धनगर टाकळी,कानखेड,निळा या ग्रामपंचायत निवडणूकीत मतदारांनी प्रस्थापितांना मात देत बदल घडवून आणल्याचे निदर्शनास येत असून कानखेड ग्रामपंचायत सरपंच पदावर विद्यमान सरपंच तुकाराम सालपे गटाच्या सरपंच उमेदवार सपना तुकाराम सालपे यांचा ५५ मतांनी पराभव करून सुमन मारोती बखाल या विजयी झाल्या तर धनगर टाकळी ग्रामपंचायत निवडणूकीत मागील १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या पुर्व सरपंच शिवाजी साखरे गटाच्या सरपंच उमेदवार सुनिता शिवाजी साखरे यांचा मिराबाई हरिभाऊ साखरे यांनी तब्बल ८९६ मतांनी दणदणीत पराभव केला तर निळा ग्रामपंचायत सरपंच उमेदवार प्रतिभा गोविंद सुर्यवंशी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमल डिगांबर सुर्यवंशी यांचा २३० मतांनी पराभव केला यावेळी ग्रामपंचायत निवडणूकीत धनलक्ष्मीचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या प्रस्थापितांनाही सोन्याची संधी प्राप्त झाल्याचे जनसामान्यांतून बोलले जात आहे.

💥तहसिल कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा गोधळ माजवणाऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज :-

पुर्णा तहसिल कार्यालयात ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजनी सुरू असतांना तहसिल कार्यालया समोरील पुर्णा-ताडकळस मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दीसह गोधळ माजवणाऱ्या समर्थक विरोधक कार्यकर्त्यांनी गोंधळ माजवल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने गोंधळ माजवणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या