💥पाथरी तालुक्यातील श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तात्काळ मंजूरी देण्यात यावी...!

 


💥या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे विधानभवनासमोर उपोषण💥

परभणी (दि.22 डिसेंबर) : श्री साईबाबा यांच्या जन्मभूमीत म्हणजे पाथरीतील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी देवून गती द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज गुरुवार दि.22 डिसेंबर रोजी विधानभवनासमोर लाक्षणिक उपोषण केले.

            श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पाथरी नगरपालिका व परभणी जिल्हाधिकारी यांनी तीनवेळा राज्य सरकारकडे सादर केला. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीच्या बैठकीतून या आराखड्यास मान्यताही बहाल झाली. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीतून आराखड्यास अंतीम मंजूरी मिळेल, असे अपेक्षित होते. मुख्य सचिव अजय मेहता यांनी 14 फेबु्रवारी 2020, त्या पाठोपाठ मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी 4 जून 2021 व त्या पाठोपाठ मनोकुमार श्रीवास्तव यांनी 20 सप्टेंबर 2022 च्या उच्चाधिकार समितीच्या बैठकांमधून वारंवार त्रुटी दाखविल्या व सुधारीत आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे अद्यापपर्यंतही या आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यताच मिळाली नाही, अशी खंत आमदार दुर्राणी यांनी व्यक्त केली.

            मुख्यमंत्री या नात्याने आपण या जन्मभूमीच्या विकासाकरीता आपण पालकत्व स्विकारावे व मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीतून कामांना गती द्यावी, अशी मागणी आमदार दुर्राणी यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या