💥वास्तवतेचा रमणीय अविष्कार म्हणजे विज्ञान प्रदर्शन....!

[सेलू: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्यावेळी गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांचा सत्कार करताना संस्थेचे सदस्य जयंत दिग्रसकर,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर आदी.]

💥गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांचे प्रतिपादन💥

सेलू (दि.29 डिसेंबर) - शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच आपले ध्येय असुन वास्तवतेचा रमणीय अविष्कार म्हणजे विज्ञान प्रदर्शन होय असे प्रतिपादन सेलू पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी येथील केशवराज बाबासाहेब विदयालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात केले पंचायत समिती शिक्षण विभाग सेलू व श्री केशवराज बाबासाहेब विदयालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर  केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश खारकर, केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य जयंत दिग्रसकर,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, केंद्र प्रमुख गजानन भित्ते,परीक्षक श्री कवडे,जाधव,आकात,झमकडे शाळेच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष नावकर,साधन व्यक्ती व समन्वयक अंजली पद्माकर,सुनीता काळे,सौ आमले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की,विज्ञान प्रदर्शनातून  विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो तसेच काहीतरी नाविन्यपूर्ण करावे असे त्यांना वाटते.या पुढच्या काळात देखील असेच विज्ञान प्रदर्शन शाळांतर्गत आयोजित करण्यात यावेत जेणे करून या स्पर्धेच्या युगात आपण परिपूर्ण विद्यार्थी बनवू शकू यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिकांची माहिती रंजक रितीने विचारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच श्री केशवराज बाबासाहेब विदयालयाने कमी वेळेत छान आयोजन केले त्या बद्दल संस्थेचे कौतुक केले.

अध्यक्षीय समारोपात जयंत दिग्रसकर यांनी असे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येतील व त्यासाठी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणार असल्याचे सर्व मान्यवरांना आश्वस्त केले.संस्थेचे सदस्य प्रविण जोग व प्रविण माणकेश्वर यांनी देखील विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या प्रसंगी खेलो इंडिया अंतर्गत  राज्य स्तरावर प्रथम व राष्ट्रीय स्तरावर द्वितीय  क्रमांक पटकावून शाळेचा व तालुक्याचा नावलौकिक वाढवल्या बद्दल गायत्री वाकोडीकर या विद्यार्थिनीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून 45,माध्यमिक गटातून 14,प्राथमिक शिक्षक गटातून 4,माध्यमिक शिक्षक गटातून 3,तर प्रयोगशाळा सहाय्यक गटातून 2 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यावेळी शहरातील विविध शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ एडके यांनी केले तर  आभार प्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले.

* स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षक पुढीलप्रमाणे :-

*प्राथमिक गट*

1.प्रथम-वरद सारडा

 प्रिंस इंग्लीश स्कूल सेलू

2.द्वितीय-लाये समृद्धी

नूतन कन्या प्रशाला सेलू

3.तृतीय-बेरगुडे सायली

माॅडर्न इंग्लीश स्कूल सेलू

* माध्यमिक गट *

प्रथम-इबितवार वैष्णवी

शांताबाई नखाते वि.वालूर

द्वितीय-अब्दुल बारी

प्रिंस इंग्लीश स्कूल सेलू

तृतीय-प्रताप पौळ

ज्ञानतीर्थ वि.सेलू

* प्राथमिक शिक्षक गट *

प्रथम - किर्ती राऊत

नूतन कन्या प्रशाला सेलू

* माध्यमिक शिक्षक गट *

सौ.गांजापुरकर 

नूतन विदयालय सेलू

*प्रयोगशाळा सहाय्यक*

हजारे एम डी.

नूतन विदयालय सेलू

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या