💥असे युवा जिल्हाध्यक्ष ॲड.सुनिल शिवाजीराव बुधवंत यांनी शेतकरी बांधवांना पाठिंबापत्र देऊन कळविले आहे💥
जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर
दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी, मानवत तहसील कार्यालयावर काढल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांच्या मोर्चास, आम आदमी पार्टी परभणीचा पाठिंबा असून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्या मोर्चात सहभागी होणार आहेत, असे आम आदमी पार्टी परभणीचे युवा जिल्हाध्यक्ष ॲड. सुनिल शिवाजीराव बुधवंत यांनी शेतकरी बांधवांना पाठिंबापत्र देऊन कळविले आहे.
कापसाचा वायदे बाजार चालू करणे, महागाई कमी करणे, शेतमालाचा भाव वाढविणे, पिक विमा वेळेवर आणि योग्यरीत्या देणे, शेतीला रात्री सुद्धा वीज पुरवठा करणे या आणि इतर अशा शेतकरी बांधवांच्या मागण्या असून त्यांना आम आदमी पार्टीचा संपूर्ण पाठिंबा असून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पाठिंबा दर्शविण्यासाठी या मोर्चात सहभागी होणार आहेत.....
0 टिप्पण्या