💥जेष्ठ पत्रकार जिजामाता सैनिकी शाळाचे संस्थापक अध्यक्ष समाधानभाऊ सावळे यांचे दुःखद निधन....!


💥डोंगर शेवली या छोट्याशा खेड्यातून संघर्षाची लेखणी हातात धरत समाधान भाऊ बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या आकाशात सूर्याप्रमाणे चमकले💥

बुलढाणा ( दि.03 डिसेंबर) : राजमाता जिजाऊ सैनिकी शाळा चांदईचे संस्थापक अध्यक्ष तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष समाधानभाऊ साहेबराव सावळे यांचे मुंबई येथे शुक्रवारच्या मध्यरात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास निधन झाले. मागील पंधरा दिवसांपासून ते मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होते यकृताच्या आजाराशी काही दिवसांपासून आजारी होते.

 डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. डोंगर शेवली सारख्या छोट्याशा खेड्यातून संघर्षाची लेखणी हातात धरत समाधान भाऊ बुलढाण्याच्या पत्रकारितेच्या आकाशात सूर्याप्रमाणे चमकले.  बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारितेतील झंझावात म्हणून त्यांनी दोन दशके गाजवली होती नंतर स्वतःला त्यांनी शैक्षणिक कार्यात वाहून घेतले होते. 1 मार्च 1967 रोजी जन्मलेल्या समाधान भाऊंना अवघे 56 वर्षांचे आयुष्य मिळाले. जिंदगी जिओ काटो मत, असा संदेश  देणाऱ्या समाधानभाऊंची अकाली एक्झिट अनेकांना शोकसागरात बुडवून गेली आहे. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आज शनिवार 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता डोंगर शेवली येथे त्यांच्या गावी ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि विवाहित मुलगी तसेच नातू पणतूनी भरलेला मोठा परिवार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या