💥जिंतूर-परभणी महामार्गावरील कोक गावाजवळ दुचाकीला वाचवण्यात एसटी बसचा अपघात....!


💥एसटी चालक,वाहकासह सहाजन जखमी💥


जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर- परभणी महामार्गावरील कोक गावाजवळ असलेल्या स्वाद धाब्याजवळ एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी महामंडळाची बस रस्ता सोडून एका खड्ड्यात जाऊन विद्युत खांबाला आदळल्याने सहा जण जखमी झाले झाल्याची घटना. ही घटना रविवार दि १८ डिसेंबर रोजी  घडली. या अपघातात जखमी झालेल्या चालक, वाहकासह अन्य चार प्रवाशांना बोरी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदेड आगाराची बस क्रमांक एमएच २० बीएल ३७२२ जिंतूर येथून नांदेडकडे जात होती कोक जवळील स्वाद धाब्याच्या परीसरात रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्या शेजारील एका खड्डयात जावून विद्युत खांबाला आदळली यामध्ये बसच्या समोरील भाग पुर्णत: चेंदामेंदा झाला आहे.या अपघातात बसचे चालक मोहमंद मुस्तफा मोहमंद अकलम (नांदेड), वाहक गजानन बापुराव हिवरे (नांदेड) यांच्यासह नेहरूबी शेख हुसेन (रा.देवसडी), शेख हुसेन शेख अकबर (रा.देवसडी), नामदेव यादवराव भरकड (परभणी), राजु लक्ष्मण पवार (रा.बोरी) असे एकुण सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच नागरीकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली नागरीकांनीच जखमींना बोरी रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली या जखमींवर बोरी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते या जखमीतील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात येणार होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या