💥महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पूर्णा तालुकाध्यक्ष पदावर रेखाताई जोंधळे यांची निवड....!


💥तालुकाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल रेखाताई जोंधळे यांचा मान्यवरांनी केला सत्कार💥


शिक्षक बांधवांची संघटना असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या पूर्णा तालुका अध्यक्ष पदावर मा रेखा जोंधळे यांची निवड झाल्याबद्दल केंद्रीय कन्या शाळा पूर्णा येथे मान्यवर मंडळींच्या हस्ते त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.


यावेळी ज्येष्ठ शिक्षक वसंतराव पांपटवर सर, अनंता भोकरे, पुष्पलता दासरवर, साने ताई, बोगळे ताई,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष म अनिस बाबुमिया आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी शिक्षक अनंता भोकरे यांचा वाढदिवस फळे कापून साजरा करण्यात आला,केक सारख्या पदर्थापासून होणारे अपाय टाळण्यासाठी हा वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला, यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी याप्रसंगी आनंद व्यक्त केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या