💥एसटी प्रवास आरामदायी होणार लाल परीमध्ये मिळणार अनेक जबरदस्त सुविधा.....!


💥सध्या दोन हजार बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून त्यासाठी 700 कोटींचा खर्च अपेक्षित💥

✍️ मोहन चौकेकर 

सर्वसामान्यांचा एसटी प्रवास आता आणखी आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाने जून- 2023 पर्यंत 3200 साध्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या या बसमध्ये 'पुशबॅक बकेट' आसने बसवण्यात येणार आहेत.

सध्या दोन हजार बस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी 700 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी राज्य सरकार देणार आहे. या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे.

* गाड्यांचा खडखडाट थांबणार :-

एसटी प्रवास करताना, काचांच्या तावदानांचा मोठा आवाज येतो. हा आवाज रोखण्यासाठी नव्या गाड्यांमध्ये उच्च प्रतीच्या रबरी मोल्डमध्ये काचा बसविल्या जाणार आहेत. त्यामुळे गाड्यांचा खडखडाट थांबणार आहे.

तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटीच्या रंगात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे लाल व पांढऱ्या रंगात गाड्या आल्या होत्या. मात्र, नवीन साध्या गाड्या लाल रंगातच असणार आहेत......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या