💥शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेलले पत्रकार गोविंद वाकोडे यांना सोडलं....!


💥मराठी पत्रकार परिषद व इतर पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर सरकार व पोलीस प्रशासनाने घेतला निर्णय💥                                  

✍️ मोहन चौकेकर

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील  यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आलं होतं. पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं. रात्री उशीरा त्यांना सोडण्यात आलं आहे.  चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली होती. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलीसांना सापडलं होतं, अशी माहिती देखील समोर आली होती. त्यानंतर गोविंद वाकडेंवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्या अटकेची बातमी समजताच राज्यभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या होत्या.

दरम्यान आता पत्रकार गोविंद वाकडे यांना पिंपरी पोलिसांकडून सोडण्यात आले आहे. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी गोविंद वाकडे यांना सोडून दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात गोविंद वाकडे हे शाई फेक करणाऱ्या आरोपींच्या आधीपासून संपर्कात होते असा त्यांच्यावर आरोप झाल्याने काल रात्रीपासून गोविंद वाकडेंना पोलिसांकडून पोलीस ठाण्यात ताब्यात घेण्यात आले होते. गोविंद वाकडे यांना पोलिसांनी सोडले आहे. गुन्हे मागे घेतले आहेत. वाकडे यांची सुटका झाल्याने उद्याचे निषेध एसएमएस आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी सांगितलं आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या