💥परभणी जिल्ह्यातील शेतमजूरांच्या प्रश्‍नांवर लोकसभेत गरजली परभणी जिल्ह्याची बुलंद तोफ....!


💥जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी शेतमजुरांच्या प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधत मानधन वाढ व मनरेगाचीकेली मागणी💥

परभणी (दि.20 डिसेंबर) : कामगारांप्रमाणे शेतमजूरांना देखील केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळावा, अशी मागणी परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी काल सोमवार दि.19 डिसेंबर 2022 रोजी लोकसभेत प्रश्‍नोत्तरा दरम्यान केली.

देशाचे सर्वोच्च सदन असलेल्या लोकसभा सभागृहात शेतमजुरांच्या हक्कासाठी प्रथमच एका लोकप्रतिनिधीने आवाज उठवून त्यांना अन्य कामगारांप्रमाणे केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली त्यामुळे खा.संजय जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. खासदार जाधव यांनी शेतमजूरांच्या प्रश्‍नांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधतेवेळी कामगारांप्रमाणे शेतमजूरसुध्दा मोठ्या प्रमाणावर निरक्षर आहेत, असंघटीत आहेत. या शेतमजूरांना केंद्र पुरस्कृत योजनांचा दुर्देवाने मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत नाही, या शेतमजूरांना योजनांचा अधिकाधिक लाभ मिळविण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल या गोष्टीचा सरकारने विचार केला पाहिजे. तसेच शेतमजूरांना मनरेगात समाविष्ट करण्यांसदर्भातही गांभीर्याने विचारमंथन केले पाहिजे. शेतमजूरांच्या उत्पन्नात वृध्दी, मानधनातही वाढ करण्या संदर्भात केंद्र सरकारने काय पाऊले उचलली आहेत, अशी विचारणा केली. यावेळी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री रामेश्‍वर तेली यांनी खासदार जाधव यांच्या प्रश्‍नावर लोकसभेत उत्तर देतेवेळी, “शेतमजूरांना श्रमकार्ड वितरीत करीत आहोत. कामगारांप्रमाणे शेतमजूरांनासुध्दा आतापर्यंत 39 कोटी कार्ड वितरीत केल्या गेले आहेत. 48 कोटी कार्ड वितरणाचे उद्दिष्ट आहे. विशेषतः या कार्डधारकांना पंतप्रधान श्रम योजनेतून मानधन दिल्या जात आहे. खासदार जाधव हे अनुभवी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या परभणी मतदारसंघातही 1लाख 70 हजार कामगारांची नोंदणी झाली असून त्यात 90 हजारांवर शेतमजूर आहेत. मनरेगांतर्गत योजनांचा लाभ होण्यासंदर्भात संबंधीत मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल,” असे ते म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या