💥राज्यातील महाविद्यालयांचे ऑडिट होणार, विद्यार्थी-पालकांचा फायदा होणार......!

 


💥संस्था विकास आराखडा’ तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ.देवळाणकर यांनी दिल्या💥


✍️ मोहन चौकेकर 

राज्यातील सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षण (ऑडिट) केले जाणार आहे. सरकारी महाविद्यालयांचा ‘संस्था विकास आराखडा’ (आयडीपी) तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

* 'नॅक'साठीही प्रोत्साहन देणार :-

कॉलेजबाबत विद्यार्थी-पालकांना माहिती मिळावी, यासाठी सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार, दर तीन वर्षांनी महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय ऑडिट करणे बंधनकारक आहे.

आतापर्यंत ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता राज्यातील सर्व महाविद्यालयांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. तसेच 'नॅक' मूल्यांकनासाठीही महाविद्यालयांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

जून-2023 पासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामध्ये 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम हा पहिला टप्पा असेल. शिवाय, सरकारी महाविद्यालयांचा ‘संस्था विकास आराखडा’ तयार करणार असल्याचेही डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या