💥परभणी मनपाने नियमबाह्य व चुकीच्या पध्दतीने शहरातील खड्डे बुजवून नागरीकांचे आरोग्य आणले धोक्यात...!


💥मनपा नगर अभियंत्याची चौकशी करुन तात्काळ कार्यवाही करा : प्रहार जनशक्ती पक्षाची आयुक्ताकडे मागणी💥


परभणी (दि.०९ डिसेंबर) - महानगरपालिकेच्या वतीने परभणी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले असून अत्यंत चुकीच्या पध्दतीने शहरातील खड्डे बुजविल्याने शहरामध्ये मोठया प्रमाणावर धुळ पसरली असून धुळीचे कण श्वसननलिका व डोळयांमध्ये गेल्याने शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच सी सी रोड वर टाकलेल्या उघड्या गिट्टीवरुन वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत त्यामुळे शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगर पालिका आयुक्त मॅडम यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरातील सी सी व डांबर रोडवर गिट्टी व डस्ट वापरून खड्डे बुजविण्याचा प्रताप महानगर पालिकेने केला आहे. अगदी सामान्य व्यक्तीला देखील कळेल की सी सी व डांबर रोडवर गिट्टी बसत नाही परंतु अकार्यक्षम असलेल्या परभणी शहर महारगपालिकेच्या शहर अभियंत्याने हा अभिनव पराक्रम करून शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे शहर अभियंत्या यांनी ज्या पध्दतीने  मनमानी पध्दतीने कंत्राटाची खिरापत वाटुन महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान केले शिवाय शहरातील नागरीकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही अपेक्षित असताना महानगर पालिका प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.

शहर अभियंता यांनी शहरांमध्ये खडे बुजविण्याच्या कामाची संपूर्ण चौकशी करून शहर अभियंत्याबरोबर संबंधीत खड्डे बुजविणान्या कंत्राटदाराचे चौकशी करुन कठोर कार्यवाही करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष परभणी शहर महानगरपालिका विरोधात तिव्र आंदोलन करेल याची याची नोंद घ्यावी असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर चिटनिस  वैभव संघई, आरती जुमडे, उद्धव गरुड, सय्यद युनूस, शेख बशीर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या