💥शहीद भगतसिंह युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या सामाजिक कार्याचा रिपब्लिकन सेनेकडून सन्मान....!


💥रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजयजी वाकोडे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कुंदनसिह ठाकूर यांना सन्मानपत्र प्रदान💥


पूर्णा (दि.०२ डिसेंबर) - शहीद भगतसिंह युथ ब्रिगेड महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखील भारतीय रिपब्लिकन सेनेच्या वतीने रिपब्लिकन सेनेच्या 24 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.३० नोव्हेंबर २०२२ रोजी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजयजी वाकोडे यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष कुंदनसिह ठाकूर यांना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 यावेळी रिपब्लिकन सेनेचे प्रदेश संघटक भैया साहेब भालेराव,रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे,रिपब्लिकन सेना परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी,रिपब्लिकन सेना गंगाखेड विधानसभा अध्यक्ष राहुल पुंडगे,रिपब्लिकन सेना पुर्णा शहराध्यक्ष चंद्रमुनी लोखंडे, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या