💥रेशीम उद्योग काळाची गरज - मधुकर जोगदंड


💥अनुसंधान विस्तार केंद्र,केंद्रीय रेशम बोर्ड परभणीच्या वतीने आयोजित रेशीम शेती जागरूकता कार्यक्रमात केले प्रतिपादन💥

पूर्णा (दि.30 डिसेंबर) - तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील प्रगतशील शेतकरी मोतीराम दुधाटे यांच्या शेतावर अनुसंधान विस्तार केंद्र,केंद्रीय रेशम बोर्ड परभणी च्या वतीने दिनांक 28 डिसेंबर रोजी रेशीम शेती जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.एल.जाधव (वैज्ञानिक सी, केंद्रीय रेशीम बोर्ड परभणी) यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे  जी.आर कदम (जिल्हा रेशीम कार्यालय परभणी), माजी उपसभापती माधवराव दुधाटे, उपसरपंच डिंगाबर दुधाटे, भगवानराव दुधाटे माली पाटील,   शेती सेवा ग्रुपचे मधुकरराव जोगदंड, अमृतराज कदम, डॉ दिलीप शृंगारपुतळे, बालासाहेब हिंगे, उद्यान पंडित प्रतापराव काळे आदींची उपस्थिती होती.


उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना जी.आर. कदम म्हणाले की, रेशीम शेती ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा शाश्वत मार्ग असून पारंपारिक पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात करता येतो. नवीन पिक संगोपन पध्दतीमुळे हा व्यवसाय कमी मजूरात मोठ्या प्रमाणात करता येतो. अवघ्या १८ ते २० दिवसांत उत्पन्न देणारे रेशीम कोष हे नगदी पिक असल्याचे सांगून पुढे बोलतांना ते म्हणाले की, रेशीम शेतीसाठी पोखरा, मनरेगा व सिल्क समग्र या योजनांच्या माध्यमातून शासनामार्फत अनुदान देण्यात येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन रेशीम शेती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

वैज्ञानिक ए.एल.जाधव यांनी रेशीम शेती बाबत सविस्तर माहिती दिली तर डॉ. दिलीप शृंगारपुतळे व रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कु. एस. व्ही. साबळे यांनी केले तर आभार  एस.पी. इंगळे (व.त.स.) यांनी व्यक केले.

कार्यक्रमास गजानन तांबे गोविंदराव दुधाटे, मुंजाभाऊ जोगदंड, मोतीराम पौळ,  पंढरीनाथ शिंदे, मधुकर जोगदंड, सुदाम आबा दुधाटे,  मधुकर दुधाटे, भागवत दुधाटे, गोपाळ दुधाटे, बळीराम दुधाटे  परिसरातील देवठाणा  वझुर, फुलकळस, माहेर, ठोळा, धानोरा काळे आदीसह परिसरातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोतीराम दुधाटे, उद्धव दुधाटे, पवन दुधाटे, बाळासाहेब दुधाटे, पांडुरंग बकाल, काशिनाथ दुधाटे, शिवाजी शिंदे, पंढरीनाथ दुधाटे, ज्ञानोबा दुधाटे गजानन दुधाटे राम दुधाटे व  केंद्रीय रेशम बोर्ड, अनुसंधान विस्तार केंद्र, परभणी चे अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या